कोरोनामहाराष्ट्र

सप्टेंबरनंतरही राज्यात निर्बंध कायम- मुख्यमंत्री

कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन आहे. यावर मोठे नुकसान होऊ लागल्यामुळे पुन्हा हळूहळू जनजीवन पूर्वरत करण्यात येत आहे. जून महिन्यापासून राज्यात मिशन बिगीन अगेन सुरु करुन लॉकडाउनचे नियम टप्प्या टप्यानं शिथिल करण्यात येत आहेत. काही राज्यांनी पटापट निर्णय घेऊन व्यवहार सुरळीत केले आहेत. असे असले तरीही महाराष्ट्र सरकार कोणतही घाई करणार नाही.

यामुळे एक सप्टेंबरपासून राज्यात लॉकडाउन पूर्णपणे उठणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीदरम्यान दिले आहेत. ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमधील करोना नियंत्रण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी या तिन्ही पालिकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठाणे पालिका मुख्यालयात बैठक घेतली.

आपण यापूर्वी बऱ्याच गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली आहे, मात्र उर्वरित काही गोष्टी सुरू करता येणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी एक सप्टेंबरनंतरही राज्यात निर्बंध आणखी काही काळ कायम ठेवण्याचे संकेत दिले. यामुळे अजुनही पूर्ण लॉकडाऊन उठवण्यात येणार नाही.