कोरोनामहाराष्ट्र

श्रीमंत लोकं लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात- राजेश टोपे

कोरोनामुळे पुण्यात पांडुरंग रायकर या पत्रकाराचा मृत्यू झाला. यामुळे आरोग्य व्यवस्थेला सर्वजण दोष देत आहेत. आता कोरोनाची लक्षणं नसताना श्रीमंत लोक ICU बेड वापरत आहेत. श्रीमंत लोकं ICU बेड वर जाऊन बसतात. याबाबत जागरूक राहीलं पाहिजे. ICU बेडवर लक्षणं नसलेल्यानं दिली नाही पाहिजे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

यावेळी ते म्हणाले की ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे. 80 टक्के लोकांना लक्षण नाहीत. त्यांच्यावर परिस्थितीनुसार उपचार करत आहोत. बरेच जण लक्षणं नसताना बेड अडवून ठेवत आहेत. लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवणाऱ्यांना थांबवावं लागेल, असंही ते म्हणाले.

यावेळी पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या निधनाबाबत बोलताना ते म्हणाले की, या घटनेत अॅब्युलन्स न मिळाले हे दुर्देवी आहे. याचं समर्थन नाही. अशा घटना घडू नये म्हणून आपण नियम बनवलेत. त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.