आंतरराष्ट्रीयखेळलक्षवेधी

ऋषभ पंत शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा फोटो

Newslive मराठी-  भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याचा खुलासा केला आहे. ऋषभ पंतने गर्लफ्रेंड इशा नेगीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ऋषभ पंतने फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, ‘मला फक्त तुला आनंदी ठेवायचं आहे कारण तूच मी आनंदी असण्याचं कारण आहे’. ऋषभ पंतने फोटो टाकल्यानंतर सुरेश रैनाने लगेच फोटोवर कमेंट करत हसतानाच्या इमोजी टाकल्या. ऋषभ पंतने फोटो शेअर केल्यानंतर गर्लफ्रेंड इशानेही तोच फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला.

‘माझा जोडीदार, माझा जवळचा मित्र, माझ्या आयुष्यातील प्रेम’, असं इशाने फोटोसोबत लिहिलं होतं.