महाराष्ट्रलक्षवेधी

अखेर सुशांतसिंग केस प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक

गेल्या अनेक दिवसांपासून सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी तपास सुरू आहे. अखेर NCB ने मोठे पाऊल उचलले असून रियाला चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज अखेर इतक्या चौकशीनंतर सुशांत प्रकरणात आणि ड्रग्स कनेक्शनमध्ये इतकी मोठी अटक झाली आहे.

अनेकवेळा चौकशी झाल्यानंतर NCB ने रियाला अखेर अटक केली. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांना अगोदरच ताब्यात घेतले होते. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती नियमितपणे ड्रग्स खरेदी करत होते असा आरोप त्यांच्यावर होता. सुशांतसुद्धा ड्रग्स घेत होता असा खुलासाही शौविकने चौकशीदरम्यान केला होता.

सलग तीन दिवसांच्या चौकशीत रियाने अखेर कबूल केले की, ती ड्रग्स घेत होती. ड्रग्स बाबत सुरू असलेल्या तपासासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत स्वतः रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे. एवढच नाही तर रियाने NCB ला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलीवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली आहे. रियाने कोणत्या कलाकारांची नावे घेतली हे अजून NCB ने स्पष्ट केलेले नाही. मात्र यामध्ये अनेक मोठे कलाकार अडकण्याची शक्यता आहे.