आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला अटक करण्यात आली आहे. तर या दोघांचाही जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे. अंमली पदार्थ दिल्याच्या प्रकरणात एनसीबीने रिया आणि शौविक चक्रवर्तीला अटक केली होती.

दोघांचाही जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. शिवाय यांच्यासोबत सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत याचांही जामिन फेटाळला आहे. रिया चक्रवर्तीने अटक झाल्यानंतर दुसऱ्यांदा जामिन अर्ज केला होता. रियाला अटकेनंतर पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान तिने जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे. 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली. यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयकडे हा तपास सोपवला. ड्रग्जचा विषय आल्यामुळे नार्कोटीक्स विभागाने कारवाई करत रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक केली आहे. यामुळे जेलमध्येच तिला रहावं लागेल.