आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

रिया चक्रवर्तीने चोरला होता सुशांतच्या डेबिट कार्डचा पिन, सीबीआय चौकशीत माहिती समोर

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात खळबळ उडालीआहे. सीबीआय आता या प्रकरणाची चौकशी करत आहे. सीबीआय रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. पण यादरम्यान अशी बातमी आहे की रिया चक्रवर्ती यांनी सुशांतच्या डेबिट कार्डचा पिन चोरला होता. अशी माहिती आता समोर येत आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिचा प्रियकर सुशांतसिंग राजपूत याच्या डेबिट कार्डचा पिन चोरी केल्याची माहिती सूत्रांनी झेडई न्यूजला दिली. रियाने सॅम्युअल मिरांडाच्या मदतीने सुशांतचा डेबिट कार्ड पिन मिळविला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

यामुळे रियावर संशय वाढला आहे. अजूनही तिची चौकशी सुरूच आहे. तसेच त्याच्या मित्रांची देखील चौकशी सुरू आहे. याप्रकरणी राजकारण देखील केले जात आहे. सुरुवातीला महाराष्ट्र बिहार यांच्यामध्ये संघर्ष बघायला मिळाला.