आंतरराष्ट्रीयमहाराष्ट्र

ड्रग्जच्या नशेबद्दल रिया चक्रवर्तीने सांगितले धक्कादायक कारण

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील संशियत आरोपी रिया चक्रवर्तीला ड्रग्स सेवनाप्रकरणी अटक करण्यात आली. अंमली पदार्थविरोधी विभागाने ही कारवाई केली. चौकशीमध्ये रियाने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने सलग तिस-या दिवशी रियाला चौकशीसाठी बोलवले होते. तसेच सोमवारीही रियाची दीर्घकाळ चौकशी झाली. यावेळी रियाने ‘मी कधीही ड्रग्ज घेतले नाही, असे सांगितले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी झालेल्या चौकशीमध्ये तिने ड्रग्स खरेदी केली होती. मात्र कधीच त्याचे सेवन केले नाही, असे रियाने सांगितले होते. परंतु, मंगळवारी पुन्हा तिची या प्रकरणी कसून चौकशी करण्यात आली. यावेळी रियाने ‘सुशांतने मला ड्रग्सचे सेवन करण्यासाठी बळजबरी केली होती’, असे तिने या चौकशीदरम्यान सांगितले आहे. ‘मी अनेक वेळा ड्रग्स घेण्यास नकार दिला होता.

नंतर सुशांतने बळजबरी केली होती. त्यामुळे काही वेळा गांजाचे सेवन केले होते,’ असे ती म्हणाली. चौकशीच्या तिसऱ्या दिवशी रियाला अटक करण्यात आली आहे. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते.