आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

रॉबर्ट ट्रम्प यांचे निधन

Newsliveमराठी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धाकटे बंधू रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्रीन्यू यॉर्कमधील रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू यॉर्क येथील रुग्णालयात जाऊन रॉबर्ट यांची भेट घेतली होती.आपले धाकटे बंधू आणि जिवलग मित्र रॉबर्ट ट्रम्प यांचे निधन झाल्याचे जड अंत:करणाने आपण जाहीर करीत आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी रात्री प्रसृत केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. रॉबर्ट यांची उणीव आपल्याला सातत्याने भासणार आहे, मात्र त्याची स्मृती आपल्या हृदयात कायम राहील, रॉबर्ट तुमच्या आत्म्याला शांती लाभो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. रॉबर्ट काका, तुम्ही आमच्या हृदयात कायम राहाल, असे इव्हान्का ट्रम्प यांनी ट्वीट केले आहे.

रॉबर्ट ट्रम्प यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती, त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता, त्यामुळे अलीकडेच त्यांना मॅनहटनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.