महाराष्ट्रराजकारण

मुंबईतील डबेवाल्यांच्या मदतीला आले रोहित पवार, केले हे आवाहन

कोरोनाचा फटका अनेकांना बसला आहे. कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनचा फटका मुंबईच्या डबेवाल्यांनाही बसला आहे. सध्या या डबेवाल्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय. अशातच आमदार रोहित पवार हे डबेवाल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील डबेवाल्यांसाठी निधी उभा करून दिला आहे. शिवाय इतर नागरिकांनाही डबेवाल्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे

रोहित पवार ते ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुंबईतील डबेवालेही आज अडचणीत आहेत. काल त्यांना भेटलो. त्यांना मदत करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. त्यांनी मदत करायची असेल तर एक नंबर दिला आहे. त्यावर संपर्क करून मदत करण्याचे आवाहन केले आहे.