महाराष्ट्रराजकारण

रोहित पवारांना काहीही नॉलेज नाही- राम शिंदे

आमदार रोहित पवार यांना काहीही नॉलेज नसताना ते कर्जत जामखेडमध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आरोग्य विभागात राजकीय हस्तक्षेप करून, अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. अशी गंभीर टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे.

विषाणूच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथील तालुका आरोग्य अधिकारी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामधील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या अचानक बदल्यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता प्रखर टीका केली. यामुळे मतदारसंघात खळबळ उडाली आहे. कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयामध्ये असलेल्या कोरोना सेंटरला शिंदेंनी भेट देऊन पाहणी केली. “मतदारसंघांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. अशावेळी काही नॉलेज नसलेली व्यक्ती हस्तक्षेप करीत असल्याचे दिसून आले.

त्यामुळे लोकांच्या जीवाशी ते खेळत आहेत. याचा त्यांना विसर पडला आहे. याठिकाणी डॉक्टर व प्रशासन यांना काम करू द्यावे वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव महत्वाचा असतो. मात्र माहिती नसतांनाही काहीजण हस्तक्षेप करतात. अशी टीका राम शिंदे यांनी पवारांवर केली आहे.

यावेळी त्यांनी तेथे असलेले रुग्ण त्यांची असलेली सर्व व्यवस्थेची पाहणी केली. याचप्रमाणे काही रुग्णांशी देखील त्यांनी याबाबत चर्चादेखील केली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पुंड यांनी त्यांना त्या सेंटरची सर्व परिस्थितीची माहिती दिली.