महाराष्ट्रराजकारण

रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैध !

Newslive मराठी-  कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने रोहित राजेंद्र पवार ( रा. बारामती) यांना उमेदवारी दिली आहे.

तसेच त्यांचा उमेदवारी अर्जही मंजूर झाला आहे. परंतू त्यांच्या विरोधात भरलेल्या डमी उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला आहे. त्याचेही नाव रोहित राजेंद्र पवार ( रा. पिंपळवाडी ता. पाटोदा) असं आहे.

प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याने त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. दरम्यान, यामुळे विरोधकांचा डावही फसला.

दरम्यान, याच मतदारसंघात राम रंगनाथ शिंदे या अपक्ष उमेदवाराचा अर्ज असून, तो मात्र मंजूर झाला आहे. भाजपतर्फे पालकमंत्री प्रा. राम शिंदे येथून निवडणूक लढवित आहेत.

मित्रा मराठीत लिहायचं रे… पार्थ पवार ट्रोल

मोदी चुकीचे बोलले, बुद्ध काही उपयोगाचा नाही – संभाजी भिडे

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi