देश-विदेशबातमी

CAA विरोधातील बहिष्काराला उत्तर देण्यासाठी RSS ची नवी ‘सुपरमार्केट’ नीती

Newslive मराठी- सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधात या वर्षी जानेवारी महिन्यांत देशातील विविध राज्यांमध्ये बरीच निषेध आंदोलनं आणि बहिष्कारांची प्रकरणं झाली. यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक आणि विशेषतः मुस्लिमबहुल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलनं झाली. त्यामुळे इथल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली होती. या नव्या कायद्याबाबत जनजागृतीसाठी भाजपाने चौकाचौकांमध्ये चर्चांची योजना आखली मात्र त्याचा फायदा झाला नाही.

त्यामुळे आता केरळमध्ये मुस्लिमबहुल भागांतून होत असलेल्या सीसीएविरोधी बहिष्काराला उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) अक्षयश्री मिशनअंतर्गत सुपरमार्केट उघडण्याची योजना आखली आहे. संघ परिवारातील सहकार भारती या संघटनेकडून चालवल्या जाणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांचं हे जाळं आहे.

सहा वर्षांपूर्वी सुरु झालेल्या अक्षयश्री मिशनची सुरुवातीला केवळ 24 सुपरमार्केट्स होती. तर गेल्या दहा महिन्यांत 10 आणखीन सुपरमार्केट्स सुरु करण्यात आले आहेत. इतर 40 सुपरमार्केट्ससाठीची नोंदणी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

केरळमधील हिंदू ऐक्यवादी संघटनेचे सरचिटणीस आरवी बाबू यांनी सांगितले की, ‘जानेवारी महिन्यांत सीएएवरील बहिष्काराला उत्तर देण्यासाठी अधिकाधिक सुपरमार्केट लॉन्च करण्यात येत आहेत. अक्षयश्री मिशन नावाने आधिच काही दुकानं सुरु करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सुरु करण्यात आलेली सुपरमार्केट्स ही सीएएच्या बहिष्काराविरोधात सुरु करण्यात आली आहेत.”

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या नावाखाली महाविकासआघाडी सरकारचा भ्रष्टाचार; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

-भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi