बातमीमहाराष्ट्र

सोशल मीडियावर मराठा आरक्षण रद्द झाल्याची अफवा

Newslive मराठी- सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मराठा आरक्षण कोर्टाने रद्द केल्याचे सांगितले जात आहे.

तसेच व्हिडिओत भाजप-शिवसेना सरकारवर टीकाही करण्यात आली आहे. पडताळणी केली असता हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.

तसेच मराठा आरक्षण कायदा वैध आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी समाजबांधवांना केले.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi