Newslive मराठी- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्यांच्या योगदानाबद्दल सिडनी क्रिकेट ग्राउंडची मानस सदस्यता देण्यात आली आहे.
एससीजीच्या वतीने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. क्रिकेट खेळणारा सर्वात मोठा देश भारत कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. यामुळे कसोटी क्रिकेटला मजबुती मिळेल, असे एससीजीच्या अधिकृत वेबसाईटवर अध्यक्ष टोनी शेफर्ड यांनी सांगितले आहे.
दरम्यान, याआधी एससीजीचे मानद सदस्यत्व याआधी सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा यांना देण्यात आलेले आहे.