आंतरराष्ट्रीयबातमीमनोरंजन

संभाजी महाराजांची मालिका सोडणार नाही- अमोल कोल्हे

Newslive मराठी-  ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे मनोरंजन विश्वाला रामराम ठोकणार, अशा चर्चा होत्या.

मात्र त्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. ही मालिका सोडण्याचा विचार नाही किंवा तसा निर्णयही झालेला नाही. तेव्हा अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी विनंती कोल्हेंनी फेसबुक पोस्टद्वारे केली.

दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर या चर्चांना उधाण आले होते.