महाराष्ट्र राजकारण

मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे आक्रमक!

सध्या कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यावरून राज्यात मराठा समाज्यात नाराजी पसरली आहे. मराठा आरक्षणाबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे आज सभागृहामध्ये आक्रमक झाले आहेत. तमिळनाडूला वेगळा व महाराष्ट्राला वेगळा न्याय का? असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी राज्यसभा व लोकसभेच्या सर्व खासदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

याबाबत त्यांनी निवेदनही सादर केले होते. त्यानंतर त्यांनी आज सभागृहात आवाज उठवला आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या सभागृहात मराठा आरक्षणविषयी आग्रही मागणीने सुरुवात केली. महाराष्ट्रातील सर्व राज्यसभा व लोकसभा खासदारांनी आपापल्या परीने सभागृहामध्ये आवाज उठवला पाहिजे. याकरिता सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

राज्यातील सर्व आमदार खासदार यांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये त्यांनी आवाज उठवला आहे. मराठा आरक्षणात महत्त्वाचे योगदान हे संभाजीराजे यांचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *