महाराष्ट्रलक्षवेधी

संजय दत्त अचानक परदेशात रवाना, पत्नी मान्यताही सोबत

अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुप्फुसाचा कर्करोग झाला आहे. 11 ऑगस्ट रोजी संजय दत्तला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्याच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये किमोथेरपीचा पहिली टप्पा पूर्ण केला. आता संजय दत्त आपल्या पत्नीसह परदेशात रवाना झाला आहे. फुप्फुसाचा कर्करोगावर मुंबईत उपचार घेतल्यानंतर संजय दत्त आपल्या पत्नीसह दुबईला रवाना झाला आहे.

संजूबाबाच्या प्रकृतीसाठी बॉलिवूडमधील कलाकार आणि त्याचे चाहते चिंतातूर झाले आहे. त्यांच्या आईला देखील कॅन्सर होता.संजय दत्त आपल्या पत्नी मान्यता दत्तसह मुंबईतून दुबईला रवाना झाला. मुले शहरान आणि इकरा संजय दत्तला भेटण्यासाठी अतूर झाले होते. त्यांना भेटण्यासाठी संजय दत्त दुबईला रवाना झाला.

काही दिवसांपूर्वी संजय दत्त ने स्वत: आपल्याला फुप्फुसांचा कर्करोग झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आले होते.