बातमीमहाराष्ट्र

पाणी मिळत नसल्यामुळे सरपंचाला मारहाण

Newslive मराठी- लातूरमध्ये दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न बिकट होत आहे. त्यामुळे लोकांचा रोष लोकप्रतिनिधींवर निघत आहे.

लातूर जिल्ह्यातील हालसी गावात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी सरपंचाला मारहाण केली. राजू गगथडे असे सरपंचाचे नाव आहे.

गावातील तीन विंधन विहीरींचे रखडलेले काम पूर्ण व्हावे म्हणून नागरिकांनी 30 हजार रुपये लोकवर्गणी जमा केली. पण आचारसंहितेचे कारण पुढे करत काम न केल्याने त्यांनी संतापून सरपंचास मारहाण केली.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi