महाराष्ट्रराजकारण

सत्यमेव जयते! सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पार्थ पवारांची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निर्णय दिला. यानंतर पार्थ पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षांसोबतच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे पार्थ पवार यांना फटकारले होते. त्यांच्या म्हणण्याला कवडीची किंमत नसल्याचं त्यांनी सांगितलं होते.

यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. आता सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलं. यात त्यांनी ‘सत्यमेव जयते’ इतकंच म्हटलं आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे आपली मागणी योग्यच असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार यांनी फटकारल्यानंतरही पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे.

त्यामुळे यावर शरद पवार आणि इतरांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान अभिनेता सुशांतसिंह राजपूत
प्रकरणाचा तपास ‘सीबीआय’कडे देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्याबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.