महाराष्ट्रराजकारण

‘सहकारी बँकांना वाचवा’; शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

नुकतेच १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी मध्यमवर्गीयांच्या हितांच्या संरक्षणासाठी सहकारी बँकांना रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणल्याचं सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं तर सहकारी बँकांना आर्थिक शिस्तीची गरज असल्याचंही म्हटलं. परंतु सरकारी बँकांच्या कामकाजावर रिझर्व्ह बँकेचा प्रभाव वाढत असल्याबद्दल पवारांनी नाराजी व्यक्त केली.

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांना वाचवण्याची विनंती केली आहे. सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, या वक्तव्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील सहमत असतील असं ते म्हणाले. तसंच सहकारी बँकांनी देशात साक्षरता वाढवण्याची महत्त्वाची भूमिकाही साकारली असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे.

असं झालं तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसंच शेतीच्या कामासाठी मदत करण्याच्या आपल्या हेतूमध्ये यशस्वी होतील,” असं शरद पवार यांनी पत्रात नमूद केलं आहे. यावर आता मोदी काय निर्णय घेणार हे लवकरच समजणार आहे.