बातमीमहाराष्ट्र

चहा विका; देश नको- छगन भुजबळ

Newslive मराठी-  तुम्ही चहा विका किंवा अन्य काही विका परंतु आमचा देश विकू नका अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चांगलाच समाचार घेतला.

आज अर्थतज्ञ नाही तर इतिहास तज्ञ रिझर्व्ह बँकेचा व्यवहार सांभाळणार आहेत आणि इतिहास सांगणार आहेत असा टोलाही भुजबळ यांनी लगावला. ते राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत बोलत होते.

दरम्यान, २०१४ मध्ये फक्त विकास विकास सुरु होते आणि आता राम मंदिराचा मुद्दा घेत आहेत. यांना मंदीर नाही सरकार बनवायचं आहे, या देशात सुशिक्षित लोक किती मुर्ख आहेत हे दाखवून द्यायचे आहे असा आरोपही भुजबळ यांनी यावेळी केला.