कोरोनाबातमीमहाराष्ट्र

नवनीत राणा यांच्या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची बाधा

Newslive मराठी- खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा या दोघांच्याही कुटुंबातील सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. नवनीत कौर राणा यांच्या सासूबाई, सासरे, नणंद, पुतणे, भाची या सगळ्यांना करोनाची बाधा झाली आहे.

तसेच आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही कोरोना झाला आहे. राणा कुटुंबातल्या ज्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे त्यांना उपचारांसाठी नागपूर येथे पाठवण्यात आलं आहे. तर आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यासह इतर सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

नवनीत राणांच्या कुटुंबाबाबत ही माहिती समजताच अमरावती येथील शंकरनगर मध्ये असलेल्या त्यांच्या घरी गर्दी होते आहे. मात्र आमदार रवी राणा यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना संयम पाळण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘त्या’ पीडितेला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार खासदार नवनीत राणा

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi