महाराष्ट्रराजकारण

सात शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश; राज ठाकरेंचा शिवसेनेला धक्का

कोरोना काळात सुद्धा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. औरंगाबादमध्ये मनसेने शिवसेनेला धक्का दिला आहे. औरंगाबादमधील सात निष्ठावंत शिवसेनैकांनी मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात हा पक्षप्रवेश पार पडला. मनसेकडून ट्विट करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी औरंगाबाद पालिका निवडणुकीत शिवसेनेला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अनिल शिदोरे आणि अभिजीत पानसे आणि संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांच्या उपस्थितीत विविध संघटनांमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करण्यात आला अशी माहिती मनसेकडून ट्विट करत देण्यात आली आहे. शिवसेनेकडून यावर अजून प्रतिक्रिया आली नाही. मात्र येणाऱ्या निवडणुकीत याचा पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.