आंतरराष्ट्रीयबातमी

कौमार्य चाचणी ठरणार लैंगिक अत्याचार

Newslive मराठी- महिला अत्याचाराविरोधी प्रतिबंधक कायद्यानुसार मुलींची कौमार्य चाचणी घेणे लैंगिक अत्याचार मानला जाणार आहे.  लवकरच याबाबत अधिसूचना जारी केली जाणार आहे. राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना त्याबाबत सूचित करण्यात येणार आहे. असे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितले.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा. newslivemarathi

कंजारभट जमातीतील अनेक मुलींना या चाचणीला सामोरे जावे लागत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या होत्या. अशा घटनांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, कौमार्यचाचणी हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा समजण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने २०१७मध्ये सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा लागू केला आहे. त्याअंतर्गत जातपंचायतविरोधात सामाजिक बहिष्काराबाबत कारवाईचा पोलिसांच्या नागरी हक्क संरक्षण समित्यांनी जिल्हावार आढावा घेण्यासाठी अधिसूचना काढण्यात येणार आहे.