महाराष्ट्रराजकारण

“शरद पवारांचा राजकीय गेम अजित पवारांनीच केला”

निलेश राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बंडाचा उल्लेख करत सेनेवर टीका सोडले आहे. राणे म्हणतात, शिवसेना नेहमी पहाटेच्या बीजेपी NCP शपथविधीवर टीका करते. अजित दादा पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?,’ असा कडवा सवाल राणे यांनी शिवसेनेसाठी उपस्थित केला आहे.

अजित पवार यांच्याकडे त्यावेळी आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले, असे निलेश राणे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवार यांनीच केला, असा दावा देखील राणे यांनी यावेळी केला आहे.

यावरून आता जोरदार राजकारण पेटले आहे. राणे हे महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत असतात. आता राष्ट्रवादी या टीकेला काय उत्तर देणार हे लवकरच समजेल.