महाराष्ट्रराजकारण

कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईवर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पवारांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई पालिकेनं केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पाहावं लागेल, असंही ते म्हणाले आहेत.

कंगनाचं कार्यालय अधिकृत आहे की नाही हे मला माहिती नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नसल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. पण मुंबईत बेकायदेशीर बांधकाम काही नवीन गोष्ट नाही.

सध्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन केलेली कारवाई पाहून लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याची संधी आपण देत आहे. शेवटी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नियमावली आहे, त्यांना जे योग्या वाटलं ते त्यांनी केलं असेल, असं देखील शरद पवार यांनी सांगितले आहे. यावर आता जोरदार राजकारण पेटले आहे.