देश-विदेशबातमी

शरद पवारांनी दिली सिरम इन्स्टिट्यूटला भेट; कोरोनावरील लसीचा घेतला आढावा

Newslive मराठी- सध्या सर्वांना कोरोनावर कधी लस येणार याची उत्सुकता लागली आहे. जगप्रसिद्ध लस बनवणारी कंपनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसीत केल्या जाणाऱ्या कोरोनावरील लसीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माहिती घेतली. त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यांनी कंपनीला भेट देत कंपनीचे संस्थापक सायरस पुनावाला यांच्याशी लसीबाबत सविस्तर चर्चा केल्याचे दिसत आहे. तसेच मांजरी येथील मुख्य प्रकल्पास भेट देऊन तेथील पाहणी केली.

सध्या कोरोनाचे रुग्ण जगात सगळीकडे वाढत आहेत. या विषाणूचा नाश करण्यासाठी जगभरातील कंपन्या झटत आहेत. अनेक संशोधक या संबधीत संशोधन करत आहेत. पहिल्या टप्प्यातील चाचण्या संपून दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. ही लस कधी बाजारात उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यामुळे कोण सर्वात आधी कोरोना लस बनवेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संशोधनात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटचाही महत्वाचा वाटा असून जगभरातील 7 कंपन्यांशी त्यांनी भागीदारी केली आहे. ती कमीत कमी पैशात उपलब्ध करून देणार असल्याचे देखील पुनावाला यांनी सांगितले आहे.

त्या भागीदाराचा भाग म्हणून त्यांनी विकसित केलेली लस जरी अंतिम टप्प्यात असली तरी आपल्याला डिसेंबरपर्यंत थांबावे लागणार आहे. असे कंपनीचे चेअरमन आदर पुनावाला म्हणाले आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, अन्य कंपन्यांप्रमाणे आम्ही बाजारात लस आणण्याची घाई करणार नाही.

आम्हाला लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता महत्वाची आहे. त्यामुळे लोकांना वाट पाहावी लागणार आहे. कमीत कमी अजून सहा महिने लागण्याची शक्यता आहे.