महाराष्ट्रराजकारण

माढा लोकसभेबाबतचा निर्णय शरद पवारच घेतील – अजित पवार

Newslive मराठी-  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभेला उभं रहावं असा आग्रह पक्षाच्या सर्वच नेत्यांनी बैठकीत केला असून तेच माढातून लढवण्याबाबतचा निर्णय घेतील अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली आहे.

बैठकीत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर असतील किंवा शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, सीपीएम अशा संघटनांशी काय चर्चा झाली याचा आढावा शरद पवार यांनी घेतला. दिल्लीतील बैठकीत काय चर्चा झाली त्याची माहिती शरद पवार यांनी दिली. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मी भेट घेतली त्याबाबतची माहितीही दिली.

दरम्यान, भाजप सरकार पुन्हा येऊ नये म्हणून सर्वजण एकत्र येत आहेत. काही जागा सोडाव्या लागतील यासाठी अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला जाणार नाही असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi

दिल्लीतील परिस्थिती पाहता पवारांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी- मोहिते पाटील

पवार कुटुंबातील हे 4 सदस्य लढवणार लोकसभा…

धनगर आरक्षणासाठी मी स्वतः बैठका घेतल्या होत्या – शरद पवार