आंतरराष्ट्रीयराजकारण

…पटत नसेल तर शत्रुघ्न सिन्हांनी भाजप बाहेर पडावे- मोदी

Newslive मराठी-  भाजपवर वारंवार कडवट टीका करणारे बंडखोर नेते शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाने चांगलेच फटकारले आहे. सिन्हा यांना पक्षाची धोरणे पटत नसतील तर त्यांनी बाहेर पडावे, असा सल्ला बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी त्यांना दिला आहे.

एका आयोजित कार्यक्रमात बोलताना सिन्हा यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ही टीका जिव्हारी लागल्याने भाजपने प्रथमच सिन्हा यांनाही टोला लगावला आहे.

शत्रुघ्न सिन्हा हे भाजपचे दोन खासदार असल्यापासून ते भाजप मध्ये आहेत. सध्या ते पाटणा साहिब येथून भाजपचे खासदार आहेत.