महाराष्ट्रराजकारण

ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते- संजय राऊत

Newslive मराठी- ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करू शकते असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

तसेच शरद पवार यांच्या भेटीमागे राजकारण नाही. त्यांची भेट मी अधूनमधून घेत असतो. शरद पवार हे देशाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो त्याचमुळे मी त्यांची भेट घेत असतो. माझ्यावर टीका होते तरीही मी भेट घेत असतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी जर तसं म्हटलं आहे तर मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल यात शंका नाही. असंही राऊत म्हणाले आहेत. ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही त्यांनी सत्तास्थापनेचे धाडस दाखवू नये असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

सरकार स्थापनेसाठी अन्य पर्याय निवडण्यास भाग पाडू नका– संजय राऊत

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

बारामतीत झळकळ्या पुणेरी पाट्या

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi