महाराष्ट्रराजकारण

युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे- रावसाहेब दानवे

Newslive मराठी-  युतीबाबतचा नवा प्रस्ताव असे काही नाही. फॉम्र्युलाचे स्वरूप ठरलेले आहे.  आता फक्त घोषणा करायची एवढेच बाकी आहे. परंतु युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. आम्ही युतीसाठी तयार आहोत. असे प्रदेशाध्याक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

शिवसेना-भाजपची युती २५ वर्षांपासून आहे. मागील विधानसभा फक्त आम्ही स्वतंत्ररीत्या लढलो होतो. लोकसभाही एकत्र लढलो होतो, निवडणुकीसाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळावे, या मताचे आम्ही आहोत. काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.

दरम्यान, आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करीत राहू, आम्हाला युती करायची असल्याने आमची रणनीती झाकून ठेवलेली नाही.