महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे- निलेश राणें

बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. नाणार रिफायनरी प्रकल्प रत्नागिरीत आणू पाहणारे मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात असल्याचा दावा राणे यांनी केला होता. तसंच नाणार रायगडमध्ये होण्यासाठी चर्चा होत नसून तो राजापूरमध्ये व्हावा यासाठी प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले होते.

शिवसेनेचा अंत आता जवळ आला आहे, असं म्हणत पुन्हा एकदा राणें यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना उपनेत्याच्या मुलाची ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून चौकशी असं वृत्त एका वृत्तपत्रात छापून आलं आहे. त्या वृत्तपत्रातील वृत्ताच्या आधारावर राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “काय ओळख होती शिवसेनेची आणि आता काय झाली आहे.

ड्रग्ज व्यापारी, खंडणी मागणारे, मर्डर केस ही ओळख आजच्या शिवसेनेची. मराठीमध्ये म्हण आहे ‘अति तिथे माती’. शिवसेनेचा अंत जवळ आलाय,” यापूर्वी बुधवारीही पत्रकार परिषदेत राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. “नाणारचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचं शिवसेनेचे स्थानिक मंत्री, आमदार, खासदार नेहमी बोलत असतात. पण नाणारची एक कमिटी जी प्रकल्प आणू पाहत आहे, ती सातत्याने मुख्यमंत्री कार्यालयाच्या संपर्कात आहे. मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्याशी चर्चा करत आहे. अस सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *