महाराष्ट्रराजकारण

शिवसेना-भाजपची अवस्था ही गाजराच्या पुंगीसारखी- अजित पवार

Newslive मराठी-  एकीकडे टीका आणि दुसरीकडे हातमिळवणी ही दुतोंडी भूमिका सर्वांसमोर आली आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजपची अवस्था ही गाजराच्या पुंगीसारखी वाजली तर वाजली नाही तर फेकली अशी झाली आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेत ते बोलत होते.

हे राज्य, हा देश अठरापगड जातींचा आहे. पण स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी हे सरकार वाट्टेल ते करत आहे. सुरुवातीला जातीजातीमध्ये भांडणं लावली जात होती आणि आता यांनी देवांनाही जातीत विभागायला सुरूवात केली आहे. हे गंभीर आहे. असंही पवार यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघत आहे. हे सरकार फक्त विकासाच्या गप्पा मारत आहे. पण कुठे आहे विकास? कुठे आहे भ्रष्टाचार मुक्त भारत? कुठे आहे स्वच्छ भारत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.