आंतरराष्ट्रीयराजकारण

शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात- रावसाहेब दानवे

Newslive मराठी-  शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली. सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली असे निवेदन जिल्हाधिकार्यांना  दिले, त्यावरूनच दानवे यांनी हा निशाणा साधला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना शुक्रवारी  शेतकर्यांचे कर्ज माफ करावे. तसेच सरकारने कर्जमाफीच्या फसव्या घोषणा करुन जाहिरातबाजी केली आहे. शेतकर्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. अशा आशयाचे निवेदन दिले. या घटनेचा रावसाहेब दानवे यांनी चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान, राज्यातील ४१ लाख शेतकर्यांना आतापर्यंत २४ हजार २५० कोटी कर्जमाफी दिली आहे.  सरकार जनतेची कोणतीही दिशाभूल करत नाही. आता फक्त १० टक्के पात्र शेतकरी राहिले आहेत. त्यांचीही कर्जमाफी लवकरच होईल म्हणून विरोधकांनी अभ्यास न करता अर्जफाटे करुन आपण जनतेसाठी काही करत आहोत हे दाखवण्याचे केवीलवाणे उद्योग बंद करावे असा सल्लाही दानवे यांनी दिला.