तंत्रज्ञानदेश-विदेशराजकारण

चीनला झटका – भारताने केलं ४४ ट्रेनचं कंत्राट रद्द

Newsliveमराठी – केंद्र सरकारकडून सेमी हाय स्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनचं कंत्राट रद्द करण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. यासोबत केंद्र सरकारने चिनी कंपनीला जोरदार झटका दिला आहे. रेल्वेकडून पुढील एका आठवड्यात नव्याने कंत्राट काढण्यात येणार असून केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. पीटीआयने याबाबतच वृत्त दिलं आहे.

४४ सेमी हाय स्पीड ट्रेनचा पुरवठा करण्यासाठी असणाऱ्या स्पर्धकांमध्ये चिनी कंपनी भागीदार असणारी CRRC Pioneer Electric (India) Pvt Ltd ही एकमेव परदेशी कंपनी होती. यामुळे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय चीनसाठी मोठा झटका आहे. चीनमधील CRRC Yongji Electric Company Ltd आणि गुरुग्राम येथील Pioneer Fil-Med Pvt Ltd यांनी २०१५ मध्ये एकत्रित ही कंपनी सुरु केली होती.

रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “४४ सेमी हाय स्पीड ट्रेनच्या (वंदे भारत) निर्मितीचं कत्राट रद्द करण्यात आलं आहे. एका आठवड्यात ऑर्डर काढून नव्यानं कंत्राट मागवले जातील. यामध्ये मेक इन इंडियाला प्राधान्य असेल”.