बातमीमहाराष्ट्र

धक्कादायक! चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

Newslive मराठी-  औरंगाबाद येथील सिडको परिसरात चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

शुक्रवारी ही मुलगी शाळेतून घरी आली. शाळेतून घरी आल्यानंतर दुपारी मुलीने जेवण केले आणि लगेच झोपली. सायंकाळी उठल्यानंतर मुलीला चालताना त्रास होऊ लागला म्हणून आईने दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिच्यासोबत अतिप्रसंग झाल्याचे आईला सांगितले. डॉक्टरांचे शब्द ऐकताच मुलीच्या आईला धक्का बसला.