कोरोनामहाराष्ट्र

धक्कादायक; जगातील कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण भारतात

सध्या भारतात कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. सध्या जगाच्या एकूण कोविड १९ रुग्णवाढीत भारताचा टक्का थेट ४० वर गेला आहे. रविवारी एकूण वाढलेल्या रुग्णात भारताचा हा टक्का होता. यामुळे ही एक चिंताजनक गोष्ट आहे.

जगभरात रुग्नावाढ आणि एकूण संख्या यामध्ये अमेरिका आणि ब्राझील हे दोन देश भारताला टक्कर देत आहेत. या दोन्ही देशातील राजकीय परिस्थिती खूप काही चांगली आहे असे नाही. अशा या दोन्ही देशात प्रथम क्रमांकाची स्पर्धा सुरू असतानाच भारतातील रुग्णांची आकडेवारी वेगाने वाढत आहे.

त्यामुळे भारत या वाईट यादीत अग्रस्थानी न जाण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाचे आकडे कमी राहिल्याचे म्हटले आहे. अशातच देशातील रुग्णांचे आकडे वाढत आहेत. भारतातील रुग्ण बरे होण्याचा वेग वाढत असतानाच संख्याही वाढत आहे. मागील आठवड्यात भारतात किमान १.८४ लाख इतके रुग्ण वाढले आहेत. त्याच कालावधीत अमेरिका व ब्राझील यांच्यामध्ये १.२० लाख इतके रुग्ण वाढलेले आहेत. यामुळे आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर भविष्यात सर्वाधिक रुग्ण हे भारतात असणार आहेत.