बातमीमनोरंजन

सुशांतच्या बँक अकाउंटमधून समोर आली धक्कादायक माहिती

Newslive मराठी- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला दीड महिना उलटला असला, तरी अद्याप आत्महत्येचे कोणतेही ठोस कारण मिळाले नाही. अशात सुशांतचे वडील के. के सिंग यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येला रियाच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच याबाबत त्यांनी पाटणा पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्तीविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

या तक्रारीत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले असून, त्यात सुशांतच्या बँक अकाऊंटमधून रियाने पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोपही सुशांतच्या वडिलांनी केला होता.
सुशांतच्या वडिलांनी पाटणामध्ये दाखल केलेल्या तक्रारीनंतर बिहार पोलिसांची एक टीम तपासासाठी मुंबईला आली आहे. या टीमने सुशांतच्या बँक डिटेल्सची तपासणी केली आहे.

सुशांतने आपली बहिण प्रियंका हिचे नाव बँकेचे वारसदार म्हणून दिले होते. या तपासणीत रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीचा विमान प्रवास आणि हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च सुशांत करत होता हे समोर आले आहे.

बँक डिटेल्सनुसार 2019 च्या ऑक्टोबर महिन्यात शोविकच्या विमान प्रवासासाठी 81 हजार रुपये देण्यात आले आहेत. तर शोविकचा हॉटेलवर झालेला 4 लाख 72 हजारांचा खर्च ही सुशांतच्या अकाऊंट मधून देण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच बँक स्टेटमेंट जेव्हा पाहिले त्यावेळी त्याच्या अकाऊंटमधून वर्षात 17 कोटी रुपये खर्च झाल्याचे त्यांना समजले. धक्कादायक बाब म्हणजे 15 कोटी रुपये एका खात्यात ट्रान्सफर करण्यात आले होते. यावरून आता धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रिया चक्रवर्तीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

-सुशांत नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नाही; अंकिता लोखंडेचा खुलासा

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा