कोरोनादेश-विदेशबातमी

धक्कादायक- २४ तासांत कोरोनामुळे एक हजारहून अधिक मृत्यू

Newslive मराठी– देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. देशात आतापर्यंत २२ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ६२ हजार ६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात एक हजारांहून आधिक मृत्यू झाल्यामुळे चिंतेचे वातावरण झाले आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २२ लाख १५ हजार ७५ इतकी झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण आधिक आहे. देशात सहा लाख ३४ हजार ९४५ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १५ लाख ३५ हजार ७४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशात ४४ हजार ३८६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहे.

त्याशिवया, दिल्ली, तामिळनाडू, गुजराज, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यातही कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे.

आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार ९ ऑगस्ट २०२० रोजी चार लाख ७७ हजार २३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात दोन कोटी ४५ लाख ८३ हजार ५५८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कोरोना चाचण्याचं प्रमाण वाढल्यामुळे देशातील रुग्णांची संख्यही झपाट्यानं वाढत आहे.