आंतरराष्ट्रीय लक्षवेधी

धक्कादायक; वाघाकडून वाघिणीची शिकार

Newslive मराठी- मध्य प्रदेशातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघाने वयस्कर वाघिणीला मारल्यानंतर खाऊन टाकल्याची दुर्मिळ घटना घडली आहे.

कान्हा नॅशनल पार्कचे फील्ड डायरेक्टर के कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, ‘मुंडीदादरमध्ये शनिवारी पेट्रोलिंग करणाऱ्या एका पथकाला एका वाघिणीचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला आणि शरीरातील अर्धे अवयव गायब होते. वाघांमध्ये मांसावरून भांडणाचे किरकोळ प्रकार होत असतात. परंतु, वाघाणेच वाघिणीला खाल्ल्याचा हा दुर्मिळ प्रकार घडला आहे.

दरम्यान, समवयस्क वाघिणीची हत्या करून तिला खाण्याचा प्रकार पहिल्यांदाच समोर आलाय. या घटनेनं कान्हा पार्कच्या प्रशासनालाही धक्का बसलाय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *