बातमीव्यापार

ऑनलाईन राख्या खरेदीमुळे दुकानदार चिंताग्रस्त

Newslive मराठी- दरवर्षी रक्षाबंधनाच्या अगोदर आठ दिवस शहरात ठिकठिकाणी वेगवेगळया प्रकारच्या राख्यांचे स्टॉल लावण्यात येतात. मोठ्या शहरांमध्ये बसस्थानक परिसर, मुख्य मार्गावर तसेच मुख्य बाजारपेठत मोठ्या प्रमाणात स्टॉल लावण्यात येतात. वेगवेगळ्या प्रकारच्या रंग्याच्या आकर्षक राख्या खरेदी करण्यासाठी युवती व महिला चार दिवस अगोदरच बाजारपेठेत मोठी गर्दी करत असतात.

मात्र यावर्षी राज्यात तसेच देशात कोरोनाचे शिरकाव करत चांगलाच उद्रेक केला आहे. सलग तीन महिने लॉकडाऊन, अशात लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापाऱ्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली. सण साजरे करण्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत.

त्यामुळे दरवर्षी राखीच्या विक्रीतून लाखापेक्षा जास्त उलाढाल होत असतात. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शहरातील सर्वच महाविद्यालये बंद आहेत. एस. टी. बस देखील बंद असल्यामुळे अनेक शहरात खरेदी करण्यासाठी येणाऱ्याची संख्या अत्यंत अल्प प्रमाणात असल्यामुळे शहरात राख्याच्या माध्यामातून होणाऱ्या लाखांच्या उलाढालीवर पाणी पडणार आहे, असे अनेक व्यापारी बोलत आहेत. यामुळे त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

तसेच आता ऑनलाइन राख्या खरेदीचे सत्र चालू झाले आहे. यामुळे ग्राहक बाहेर पडत नाही. याचा देखील फटका मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘त्या’ पीडितेला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरणार खासदार नवनीत राणा

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi