बातमीमहाराष्ट्र

नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली बैठक

Newslive मराठी-  पुणे शहरात सध्या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील कामगार पुतळा वसाहत येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यासंदर्भात, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सोमवारी कामगार पुतळा येथील रहिवाशांसोबत बैठक घेतली.

तसेच  यासंदर्भात मी लवकरच पुण्याचे खासदार गिरिश बापट, मेट्रोचे अधिकारी, महानगर पालिकेचे अधिकारी व स्थानिक नागरिक यांची बैठक आयोजीत करून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन शिरोळे यांनी नागरिकांना दिले.

याप्रसंगी दत्ता खाडे, स्थानिक नगरसेविका स्वाती लोखंडे,अशोक लोखंडे, शैलेश बडदे, स्थानिक कार्यकर्ते हमीद शेख, नजीर पठाण, बबन भालके,अप्पा आखाडे, रसूल शेख व स्थानिक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केडगाव येथे डिजिटल प्रशिक्षण अभियान संपन्न

बारामतीत पहिल्यांदाच आपीएलच्या पार्श्वभूमीवर बीपीएलचे आयोजन

दिपाली धुमाळ यांना दिले विरोधी पक्षनेते पदाचे नियुक्तीपत्र

शिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात मनपाची बैठक संपन्न