आंतरराष्ट्रीयबातमी

स्मृती इराणींच्या मुलीला मिळाले ‘एवढे’ टक्के

Newslive मराठी –   केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या (CBSE) 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीच्या परीक्षेत 13 विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांनी 500 गुणांपैकी 499 गुण मिळवले आहेत.

या परीक्षेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीला 82 टक्के मिळाले आहेत. जोइश इराणी असे स्मृती इराणींच्या मुलीचे नाव आहे.

दरम्यान, तत्पूर्वी स्मृती यांचा मुलगा जोहर इराणीने 12वीची परीक्षाही चांगल्या मार्काने उत्तीर्ण केली आहे