महाराष्ट्रराजकारण

तर मोदींना आणायची वेळ आलीच नसती – परळीकरांच्या पंकजताईना कोपरखळ्या

Newslive मराठी – परळी (दि. १३) प्रतिनिधी : पंकजाताईंनी अंबाजोगाई रस्त्याचे काम इतक्या वेळा आंदोलन करूनही पूर्ण केले नाही. उलट तारीख पे तारीख करून वेळकाढूपणा केला. तीन वर्षे उलटूनही वीस किलोमीटर चा पट्टा पूर्ण करू शकल्या नाहीत, या सत्तेचा उपयोग स्वतःला निवडुन आणण्यासाठी करत आहेत. तोच उपयोग खरंच सामान्य माणसाच्या कामासाठी केला असता तर मोदींना आणायची वेळ आली नसती अशा चर्चा परळीत कट्ट्याकट्यावर रंगताना दिसत आहेत.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्याच आठवड्यात सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाचारण केले होते. त्यानंतर आता येत्या 17 तारखेला परळीत मोदींची सभा आयोजित केली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर येथील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्रांगणाचे युद्ध पातळीवर काम सुरू असून, 10 ते 12 जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई देखील सुरू आहे. याच प्रकारावरून परळीतील जनतेने मोदींना आणायच्या ऐवजी रस्ता करायला हवा होता, ऊसाची पूर्ण देयके अदा करायला हवी होती इत्यादी चर्चा चौकाचौकात रंगवलेल्या दिसत आहेत.

दरम्यान पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत असलेले विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे मात्र आपल्या विजयाबाबत खात्रीपूर्वक विश्वास व्यक्त करत आहेत. तर सामान्य जनतेमध्ये ताईंना मराठवाड्यातील मोदींची एकमेव सभा परळीत घेण्याची वेळ का आली यावरून चर्चा रंगत आहेत.

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi