महाराष्ट्रराजकारण

…म्हणून ‘वर्क फॉर्म मातोश्री’ करतो- उद्धव ठाकरे

राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. असे असताना भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘मातोश्री’तून बाहेर पडत नाही अशी टीका करत आहे. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपण ‘मातोश्री’वरुन का बाहेर पडत नाही, या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

कोरोनाची परिस्थिती, लॉकडाउन आणि मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्याचबरोबर त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. कोरोनाचे संकट संपले असं काही लोकांना वाटत आहे. त्यामुळे काही लोकांनी पुन्हा राजकारण सुरू केले आहे.

हे संकट अजूनही संपले नाही. विरोधक मी ‘मातोश्री’वरून बाहेर पडत नाही, असा आरोप करत आहे. पण मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो आहे. त्या लोकांशी बोलणे गरजेच आहे. ते काम मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करत आहे आणि काम होत आहे. आरोप करण्यांना करू द्या, त्यातूनही साध्य होणार नाही, असे प्रत्युतर उद्धव ठाकरेंनी दिले आहे. भाजपकडून मुख्यमंत्री हे घराबाहेर पडत नाहीत अशी टीका सतत केली जाते यावर आज उद्धव ठाकरेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.