महाराष्ट्र

…म्हणून मोदी भारतीय जनतेला छळतात; राज ठाकरेंनी सांगितले कारण

Newslive मराठी- मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच आपल्या व्यंगचित्रातून सर्वाचा समाचार घेत असतात. आता राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्ला केला आहे. राज यांनी आपल्या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी भारतीय जनतेचा छळ करत असल्याचे दाखवले आहे.

काँग्रेसने माझा छळ केला, म्हणून मी जनतेला छळतोय, असे मोदी म्हणत असल्याचे हे व्यंगचित्र आहे. यापूर्वी राज यांनी पंतप्रधान मोदींवर व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे.