महाराष्ट्रराजकारण

…म्हणून विरोधक आतापासून इव्हीएम सवाल करत आहेत- मोदी

Newslive मराठी- विरोधकांनी लोकसभा निवडणुकी आधीच पराभवाचा बहाणा शोधला आहे. विरोधक आतापासूनच इव्हीएमवर सवाल करत आहेत. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

विरोधकांनी महाआघाडी केली आहे आणि आम्ही सुद्धा केली. त्यांनी इतर पक्षांना एकत्र घेऊन महाआघाडी केली आहे. मात्र, आम्ही देशातील सव्वाशे कोटी जनतेसोबत केली आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा कोणती आघाडी सर्वांत चांगली आहे, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

दरम्यान, विरोधकांची महाआघाडी म्हणजे एक अनोखे बंधन आहे. हे बंधन नामदारांचे बंधन आहे. हे बंधन भाऊ-पुतण्या वाद, भ्रष्टाचार, घोटाळा, नकारात्मकता आणि असमानता यांचे गठबंधन आहे. हे एक अद्भुत संगम आहे, विरोधकांच्या कालच्या महामेळ्यात लोकशाही वाचविण्याचे काहीजण सांगत होते. मात्र, त्यांच्यातील एका नेत्यांने बोफोर्स घोटाळ्याची आठवण करुन दिली. शेवटी सत्य बाहेर येणारच, अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढविला.