महाराष्ट्रराजकारण

…तर आम्ही घरी जातो; देवेंद्र फडणवीस आक्रमक

सध्या मुंबईमध्ये अधिवेशन चालू आहे. यामध्ये अनेक प्रश्नांवर वादळी चर्चा झाली. विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावरी हक्कभंग प्रस्ताव आणि त्यावरील चर्चेला आक्षेप घेतला होता. अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर भाजपाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यानंतर कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आलं. “चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. कोरोनावर चर्चा होत नसेल, शेतकऱ्यांवर चर्चा होत नसेल, तर आम्ही येथे कशाला बसायचं,” असं म्हणत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे नेते मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आम्हाला सभागृहात बोलावलं. तसंच ३ वाजता चर्चा करण्याचं आश्वासन दिलं. चर्चाच करायची नसेल तर आम्ही घरी जातो. असं म्हणत फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

यामुळे आज अधिवेशनात मोठा गोंधळ बघायला मिळाला. यातच विधानपरिषदेच्या उपसभापतीची निवड करण्यात आली. यामध्ये शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी बाजी मारली. त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अभिनंदन केले.