बातमीलक्षवेधीलाइफस्टाईल

मानवी मेंदूबद्दल काही रोचक तथ्य

NEWSLIVE मराठी-  स्त्री आणि पुरूष यांच्या शारिरीक आणि मानसिक कार्यपद्धतीचे मूळ म्हणजे मेंदू. स्त्री आणि पुरूष यांच्या मेंदूतील फरक किंवा साम्य यावर अनेकदा संशोधन करण्यात आले. हायपोथॅलॅमस या विशिष्ट भागाच्या संदर्भात स्त्रिया आणि पुरुष यांच्या मेंदूच्या रचनेत थोडा फरक असल्याचं सुरुवातीपासून संशोधकांना आढळलं आहे. त्यामुळं स्त्रियांच्या मेंदूबद्दल पुरूषांना काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

  •  मानवी मेंदू वयाच्या 40 वर्षापर्यंत विकसित होत असतो.
  • जर स्मार्टफोन वर जास्त वेळ घालवला तर मेंदूत ट्यूमर होण्याच्या धोका वाढतो.
  • आपल्या मेंदू चा 60% हिस्सा हा चरबीने बनलेला असतो.
  • मानवी मेंदू एवढी वीज उत्पन्न करू शकतो की त्याने एक बल्ब पेटू शकेल.
  • जर मेंदू ला 5 ते 10 मिनिट ऑक्सिजन मिळाला नाही तर तो कायमच काम करणं थांबवू शकतो.
  • आपण संगीत ऐकताना आपला मेंदू डोपामाईन नामक रसायन सोडतो जो आपल्यावर सकारात्मक परिणाम घडवतो.
  • एका दिवसात आपल्या मेंदूत 70000 विचार येतात. यातील बहुतेक नकारात्मक असतात.
  •  मानवी मेंदू हा शरीराच्या फक्त 2% आहे पण तो शरीरातील 20% रक्त, ऑक्सिजन वापरतो.

स्त्रियांच्या मेंदूबद्दल माहित आहे का?

संतापाच्या भावना व्यक्त करण्याची पद्धत स्त्री आणि पुरूषांमध्ये वेगळी असते. पुरूष शारीरिक हिंसेद्वारे संताप व्यक्त करतात तर स्त्रिया भावनिक संभाषण किंवा अहिंसेचा वापर करून भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतात.

सतत बदल 
स्त्रिया ह्या पुरूषांपेक्षा जास्त शारीरिक बदलांना सामोऱ्या जात असतात. मासिक पाळी असो किंवा मग मातृत्व याचा त्यांच्या मेंदूवर परिणाम होत असतो. हे बदल स्त्रीयांच्या वागणुकीत महत्त्वाची भूमिका बजावतात.