आंतरराष्ट्रीयदेश-विदेश

सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शहांना अडकविण्यात सोनियांचा हात – स्मृती इराणी

Newslive मराठी-  सोहराबुद्दीन प्रकरणात भाजपाध्यक्ष अमित शहा यांना अडकविण्यात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा हात होता अशी टीका केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.

सोनिया गांधी यांनी जाणीवपूर्वक कट करत अमित शाह यांना सीबीआयच्या मदतीने सोहराबुद्दीन प्रकरणात अडकवले.  मात्र न्यालयाने याप्रकरणी दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो, असंही इराणी यांनी म्हटंलं आहे.

अमित शहा यांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्यासाठी हा डाव काँग्रेसने आखला होता. सीबीआयची मदत घेऊन सोनिया गांधी यांनी कट आखला, असाही आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.

सोहराबुद्दीन, त्यांची पत्नी कौसरबी आणि त्यांचा सहाय्यक तुलसीदास प्रजापती यांच्या कथित हत्या प्रकरणाच्या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली. तर अमित शहा यांचे नाव खटल्यातूनच वगळले गेले. या हत्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना इराणी या बोलत होत्या.